पावसाळी सहल

 पावसाळी सहल




मुद्दे:

पावसाळी हवेचा अनुभव

खंडाळ्याचा घाट

हिरवेगार डोंगरमाथे, कोसळणारे धबधबे 

माकडा सोबत गंमत जमत

धुके व ढग यांचा संचार ,पावसाची रिमझिम



पावसाळी सहल



खंडाळ्याच्या घाटात गाडी चाले धुक्यात' हे गाणे गात गात आम्ही खंडाळ्याला निघालो होतो. प्रत्यक्ष घाटात गाडी रिली आणि काय आश्चर्य चारी बाजूंनी डोंगरमाथ्यावर काळे ढग वर वर जाताना दिसत होते! आम्ही सगळे त्या वातावरणाने हमारावलो आणि चिडीचूप झालो! मला तर वाटत होते की, आपणही ढगांसोबत डोंगरमाथ्यावर जावे. थोड्याच वेळात पावसाची विचार रिमझिम सुरु झाली. आम्ही बसमधूनच हे दृश्य मान हरपून पाहत होतो


'आम्ही राजमाचीवर पोहोचलो. तोपर्यंत पाऊस थांबला होता. त्यानंतर डोंगरावरून वाहणारे पाण्याचे घवघवे दिसू लागले. वढ्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला. कोसळणारे पाणी सूर्याांच्या किरणांमुळे चांदीसारखे चमकत होते. हिरवी शाल परलेला डोंगरमाथा आणि दन्या पाहताना तर मन हरखून गेले होते.


एव्हाना आम्हांला खंडाळ्याला येऊन एक तास झाला होता. पण सगळेच जण त्या पावसाळी हवेचा अनोखा आनंद ताकि ग्यात गुंग झाले होते. मध्येच पुक्याचे लोट आले. आम्ही धुक्यात बुडून गेलो होतो. पाचसहा फुटांवरचेही दिसत नव्हते. ऊस होता आणि नव्हतासुद्धा. कोसळताना तो दिसतच नव्हता. पण सूक्ष्म कणांनी आम्हांला भिजवत होता. हळूहळू धुके विरत गेले. तेवढ्यात बाईंनी मक्याची गरम कणसे हातात दिली आणि मग काय! आम्ही मक्याच्या दाण्यांचा आस्वाद घेण्यात दंग झालो.


तो कणसे खाण्याचा अनुभव घेत असतानाच एक गंमत पडली. एक माकडीण आपल्या पिलाला उराशी कवटाळून बसली होती. खायला मिळेल या आशेने तो आमच्याकडे पाहत होती. माझ्या हातात भुईमुगाच्या शेंगा होत्या. त्यावर तिने झडप घातली. आम्ही सगळेच घाबरलो. पण क्षणभरच कारण ती शेंगा खाण्यात रमली होती आणि आम्ही तिला पाहण्यात रमलो. 


दिवसभर भुशी धरण, वळवण परण, कार्ला लेणी, वॅक्स म्युझिअम अशा सर्व ठिकाणी फिरलो. खूप मज्जा आली .


नंतर गरमागरम भोजनावर ताव मारला आणि परतीच्या वाटेला लागलो.




Related searches 

  • माझी पावसाळी सहल
  • माझी पावसाळी सहल निबंध मराठी
  • मराठी निबंध
  • पावसाळी सहल निबंध
  • पावसाळी सहल मराठी निबंध 



Post a Comment

Previous Post Next Post